शेतीच्या वादातून भावांनी केला भावाचा खून

नंदुरबार : शेतीच्या हिस्सेवाटणीतून भावाभावांमध्ये वाद होवून कुर्हाडी व सळईने वार करुन एका भावाचा खून केल्याची घटना शहादा तालुक्यातील रामपूर प्लॉट येथे घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामपूर येथील हिम्मत संभाजी पावरा (28) यांचे वडील संभाजी वालजी पावरा हे युवराज पावरा, सुरेश पावरा, दोहन्या पावरा यांच्या घरी शेतीच्या हिस्से वाटणीसाठी आले असता तेथे हजर त्यांच्याशी तिघा मुलांनी वाद घालून मारहाण करण्यात सुरुवात केली. यावेळी हिंमत संभाजी पावरा व त्याचा भाऊ वनसिंग पावरा हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता, युवराज पावरा याने त्याच्या हातातील कुर्‍हाडीने भाऊ वनसिंग पावरा याच्या डोक्यावर मध्यभागी वार करून गंभीर दुखापत केली. सुरेश पावरा याने वनसिंग याच्या पोटात सळई खुपसली. दोहन्या पावरा याने त्याच्या हातातील लाकडी डेंगार्याने वनसिंग याच्यावर हल्ला केला. संभाजी पावरा यांनासुध्दा सुरेश पावरा याने सळईने मारहाण करून गंभीर दुखापत केली. हिंमत पावरा यांना मारहाण केली.

या मारहाणीमुळे वनसिंग पावरा यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हिंमत पावरा व संभाजी पावरा यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. याबाबत हिंमत पावरा यांनी दिलेल्या फिर्याद दिली आहे. त्यानुसार युवराज पावरा, सुरेश पावरा, दोहन्या पावरा यांच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302, 307, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You May Also Like