बुलढाणा मतदासंघांचे आमदार संजय गायकवाड यांनी समाजात तेढ निर्माण होईल

भुसावळ : बुलढाणा मतदासंघांचे आमदार संजय गायकवाड यांनी समाजात तेढ निर्माण होईल, व बौद्ध समाजाचा अपमान होईल असे वक्तव्य केल्याने वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हा पूर्व तर्फे त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून अश्या समाज विघातक प्रवृतीस अटक व्हावी अशी मागणी केली. सदर आंदोलनाचे नेतृत्व वंचित चे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी केले.
या बाबत सविस्तर वृत्तांत असा की , बुलढाणा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी केवळ दोन कुटुंबाचे वाद असताना त्या ठिकाणी जावून ‘ मी दहा हजार गुंडाची टोळी पाठवतो त्या बौद्धाचा चांगला बंदोबस्त करा त्याचेवर उलट खोट्या केसेस दाखल करण्याचे बेताल वक्तव्य केले होते.त्यातून त्याचा मना तील बौद्ध समाजाविषयी द्वेष,तिरस्कार दिसून येते होता.एक लोकप्रतिनिधी म्हणून समाज समाजात असणारे वाद मिटविने,कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते याचा विसर आमदार महोदयांना पडलेला आहे म्हणून त्याच्या या कृतीचा निषेध व्यक्त करत त्यांच्या प्रतिमेेला जोडे मारून शहर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.त्या वेळी विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष, दिनेश इखारे जिल्हा महासचिव, गणेश जाधव भुसावळ शहराध्यक्ष, बालाजी पठाडे चिटणीस कामगार आघाडी, गणेश इंगळे तालुका सचिव, गणेश रणशिंगे तालुका संघटक,देवदत्त मकासरे भुसावळ शहर महासचिव, बंटी सोनवणे, विद्यासागर खरात, कुणाल सुरडकर, स्वप्नील सोनवणे,विजय सोनवणे,शुभम मेश्राम, महेंद्र जोहरे उपस्थित होते.

You May Also Like