कॅनडाकडून भारताच्या प्रवासी विमानांना २१ सप्टेंबरपर्यंत बंदी

टोरोंटो ।  करोना महासाथीमुळे भारतातून थेट येणाऱ्या प्रवासी विमानांना बंदीची मुदत कॅनडाने २१ सप्टेंबरपर्यंत पुन्हा वाढवली असल्याचे देशाच्या वाहतूक मंत्रालयाने सांगितले आहे.

 

 

भारतात एप्रिलमध्ये करोनाच्या दुसरी लाट आली. कॅनडाने भारतातून थेट येणाऱ्या व तेथे जाणाऱ्या सर्व विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली होती. ती उठवण्याची तारीख अनेकदा पुढे ढकलण्यात आली आहे. कॅनडाच्या नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता यांचे संरक्षण करणे हे प्राधान्याचे राहणार आहे. तर  कॅनडा व भारत यांच्या दरम्यानच्या थेट विमान वाहतुकीवर असलेली बंदी २१ सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे’, असे कॅनडाचे वाहतूक मंत्र्यांनी सांगितले आहे.

You May Also Like

error: Content is protected !!