मुंबई : मुंबईत कोरोना आटोक्यात आला होता. मात्र, दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे १५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करा, अशी मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरयांनी केली आहे. लोक कोरोनाबाबत गांभीर्य बाळगत नसल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दिल्ली, मुंबई रेल्वे सेवा आणि विमान सेवा, तसेच राज्यातून बाहेर जाणारी रेल्वे सेवाही काही काळापुरती पुन्हा बंद करावी, का असा विचार राज्य सरकार करत असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
तसेच, १५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द कराव्या, शासनाने लवकर निर्णय घ्यावा. कोविडचा आकडा फुगत आहे. लोक करोनाबाबत गंभीर नाहीत. मुंबईचं राजकारण करण्याचा घाट दोन टक्यांच्या लोकांनी घातला आहे, असा आरोप महापौर पेडणेकर यांनी भाजपचे नाव न घेता केला आहे. केवळ घर्मस्थळं मी म्हटले नाही, बारसुद्धा, बारमध्ये जाणाऱ्यांमुळेही कोरोना पसरला. कोविडचा आकडा वाढल्याने मुंबईकरांनी सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा…
आमच्या व्हॉटस्अॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा…