शिरपूर तालुक्यातील भोरखेडा शिवारात गांजाची शेती

धुळे । भोरखेडा (ता.शिरपूर) शिवारातील शेतात गांजाची लागवड केल्याचे आढळले असून शिरपुर तालुका पोलिसांनी छापा टाकूून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. गांजाची लागवड कुणी केली ते समजू शकले नसून शिरपुर तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल झाला.
शिरपूर तालुका पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी काल (ता.25) सायंकाळी पाचच्या सुमारास पीरपाणीपाडा ते सोज्यापाडा शिवारात पाहणी केली. तेथील कच्चया रस्त्यालगत सुळे परीमंडळात भोरखेडा कंपार्टमेंटमधील वनक्षेत्रात गांजासदृश झाडांची लागवड केल्याचे आढळले. मानवी मेंदूवर विपरीत परीणाम करणारा गांजाची अवैधरीत्या चोरटी विक्रीच्या उद्देशाने लागवड केल्याचे आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून 2 लाख 25 हजार 600 रूपयांचा 112 किलो वजनाचा गांजाची झाडे जप्त केली. याप्रकरणी हवालदार कुंदन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

You May Also Like