चीनला धमकावू शकत नाही; जिनपिंग यांचा इशारा

बीजिंग : आपले सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकासाचे रक्षण करण्यासाठी चीनला आधुनिकीकरणाचा स्वीकार करावा लागणार आहे. चीनला कोणतीही विदेशी शक्ती धमकावू, विरोध करू अथवा अंकित करू शकत नाही, अशा शब्दांमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी प्रतिस्पर्ध्यांना आव्हान दिले आहे. चीनमधील सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीच्या स्थापनेची शताब्दी साजरी करण्यासाठी ऐतिहासिक तियान्मेन चौकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य समारंभामध्ये ते बोलत होते.

कम्युनिस्ट पार्टीच्या शताब्दी समारंभासाठी या ठिकाणी अतिभव्य मंच उभारला गेला असून त्यावर मपीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाफचे संस्थापक माओ त्से-तुंग यांचा अतिभव्य फोटो लावण्यात आला आहे. जिनपिंग यांनी आपल्या भाषणामध्ये मकोणतीही विदेशी शक्तीफ असे म्हणून अमेरिकेला गर्भीत इशारा दिला. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन या दोघांनीही चीनविरोधात अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. व्यापार, मानवी हक्क आणि कोवि-19 विषाणूची उत्पत्ती आदी विषयांवरून अमेरिकेने वारंवार चीनला लक्ष्य केले आहे.

चीनला धमकावणे, विरोध करणे आणि अंकित करण्याचा प्रयत्न करणार्‍या कोणत्याही विदेशी शक्तीला 1.4 अब्ज चिनी नागरिकांच्या विराट भिंतीला धडक द्यावी लागेल, असे जिनपिंग म्हणाले. चीननेही कधीही कोणत्याही देशाला धमकावले नाही, विरोध केलेला नाही आणि अंकित करण्याचाही प्रयत्न केलेलाही नाही, असेही ते म्हणाले. पक्षात भेद निर्माण करणार्‍या विषाणूंना उखडून टाकले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

You May Also Like