सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना अद्यापही निकालाची प्रतीक्षा; बोर्डाने जारी केलं शेड्युल

नवी दिल्ली : सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना अद्यापही निकालाची प्रतीक्षा आहे. दहावीचा निकाल आता आणखी लांबणीवर पडला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नवीन शेड्यूल जारी केलं. सर्व सीबीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांना आणि संस्थापकांना नोटीस जारी केली आहे. या नोटिसीत सीबीएसई बोर्डाने नवीन शेड्युल दिलं आहे.

सीबीएसईच्या दहावी बोर्ड परीक्षा 2021 साठी प्रत्येक विषयासाठी जास्तीत जास्त 100 गुणांचं मूल्यांकन केलं जाईल. त्यातील 20गुण आंतरिक मूल्यांकन आणि 80 गुण वर्षाअखेरच्या परीक्षेनुसार असतील. आतापर्यंत बहुतेक शाळांनी आंतरिक मूल्यांकन केलं आहे आणि आपला डेटा सीबीएसई पोर्टवर अपलो़ड केला आहे.

याआधी सीबीएसईचा दहावीचा निकाल जूनमध्ये लागणार होता पण आता निकाल जुलैमध्ये लागणार आहे. कारण सीबीएसईने मार्क्स सबमिट करण्याच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. नव्या शेड्युलनुसार मार्क्स अपलोड करण्यासाठी पोर्टल उपलब्ध राहण्याची तारीख 20 मे 2021 आहे. या तारखेत काही बदल नाही. पण उइडए मार्क्स सबमिट करण्याची तारीख 30 जून 2021 आहे. इंटरनल असेसमेंट मार्क्स सबमिट करण्याची तारीख 30 जून 2021 आहे.

You May Also Like