भाजपच्या अहंकारामुळे देशाची स्मशानभूमि: नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई : करोना बाधितांची वाढती संख्या आणि मृतांचा आकडा यामुळे आधीच चिंता असताना त्यात आता लसींच्या तुटवड्यामुळे संसर्गाचा धोका आणखी वाढला आहे. यातच आता म्युकरमायकोसिस या नव्या आजारामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढं झालीयं. यावरू काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची थट्टा करण्याचं काम भाजपने केलं. पण त्यांच्या अहंकारामुळे देशाची स्मशानभूमि झाली असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. करोना रोखण्यासाठी केंद्राने काहीही उपाययोजना केल्या नाहीत असंही यावेळी नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळेच देश स्मशानभूमी बनला असल्याची घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली आहे. खरंतर, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी नाना पटोले हे रायगड दौर्‍यावर आहेत. तिथे ते पत्रकारांशी बोलत होते.

 

You May Also Like