केंद्राने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील करून घेऊ- लष्करप्रमुख नरवणे

नवी दिल्ली : नवनियुक्त लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठे विधान केले आहे. संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असा संसदीय संकल्प आपण केलेला आहे.पीओकेभारतात आला पाहिजे अशी जर संसदेची इच्छा असेल तर त्याबाबत आम्हाला योग्य आदेश मिळाल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू, असे सूचक विधान लष्कप्रमुख मुकुंद नरवणे यांनी केले आहे.

पाकिस्तान आणि चीनच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे तयार असल्याचं नरवणे म्हणाले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हालचालींवर करडी नजर ठेवून योग्य ती कारवाई करत पाकचे मनसुबे उधळून लावण्यात भारताला यश येत असल्याचं नरवणे यांनी सांगितलं.

पाकव्याप्त काश्मीरबाबत फक्त एका आदेशाची प्रतिक्षा
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असून भविष्यात तोही ताब्यात घेऊ असं स्पष्ट विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत केलं होतं. याबाबत लष्करप्रमुखांना विचारलं असता त्यांनी भारतीय लष्कर यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, ‘जम्मू-काश्मीर हा संपूर्णपणे अखंड भारताचाच भाग आहे.

केंद्राने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीरवरही कब्जा करू, त्यासाठी लष्कर तयार आहे’ कलम ३७० रद्द झाल्यानंतर लष्कराने काश्मीर भागात शांतता राखण्यासाठी लष्कराने अतिशय चांगलं काम केलं. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनीही लष्कराला साथ दिल्याचं नरवणे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा…

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!