केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा नाशिक दौरा अचानक रद्द…

 

नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा नाशिक दौरा रद्द झाला आहे. अमित शाह यांच्या ऐवजी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय हे नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दोन दिवसीय कार्यक्रमाचं नियोजन पूर्ण झालेलं असताना अचानक दौरा रद्द झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेमुळे देशात संतपाचे वातावरण पसरले आहे. या योजनेविरोधात देशात अनेक ठिकाणी आंदोलकांनी निदर्शने केली आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने योजनेत अनेक बदल केले आहे. या योजनेच्या विरोधात देशात काही तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे देशात अग्निपथ’ योजनेविरोधात वातावरण तापले आहे. यामुळे अमित शाह यांचा नियोजित दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मंगळवारी त्रंबकेश्वर येथे ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २१ जून रोजी साजरा करण्यात येणार होता. मात्र, अमित शाह यांचा नाशिक दौरा रद्द झाल्याने या कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्र्वर मंदिरातील योग दिवस साजरा झाल्यानंतर अमित शाह स्वामी समर्थ गुरुपीठ केंद्र, मांगीतुंगी पर्वतावर भगवान ऋषभदेव यांचा सोहळ्याला भेट देण्याची शक्यता होती. परंतु शाह यांचा दौरा रद्द झाल्याने तिही भेट रद्द झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like