केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी करोनाच्या लसींच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारला दिला सल्ला

नवी दिल्ली:  देशात करोनामुळे संसर्ग होणाऱ्या नव्या रुग्णांचा आलेख गेल्या काही दिवसांपासून घटत आहे. लसीकरण करणे करोनाला रोखण्याचा एकमेव पर्याय असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मात्र भारतातील अनेक राज्यांमध्ये लसींचा सातत्याने तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प झाले आहे. राज्यांनी अपुऱ्या लस पुरवठ्यावरुन केंद्रावर सातत्याने टीका केल्या जात आहेत. याचदरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोनाच्या लसींच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारला सल्ला दिला आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, जर लसीची मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त असल्याने समस्या निर्माण होत असेल, तर एका कंपनीला देण्याऐवजी १० आणखी कंपन्यांना लस तयार करण्यासाठी परवाना द्या. त्यांना देशात पुरवठा करु द्या आणि नंतर जास्त निर्मिती झाल्यास ते निर्यात करु शकतात.  हे १५ ते २० दिवसात केले जाऊ शकते, असं मत नितीन गडकरी यांनी मांडले.

गडकरी पुढे म्हणाले की, चंदनऐवजी डिझेल, इथेनॉल आणि बायोगॅस इंधन आणि विजेचा वापर केला गेला तर अंत्यसंस्कार करणे स्वस्त होईल असे गडकरी यांनी सांगितले. बिहार आणि उत्तर प्रदेशात अंत्यसंस्कारासाठी अधिक पैसे द्यावे लागत असल्याने मृतदेह गंगेत सोडण्यात येत आहेत, असं नितीन गडकरी यांनी सांगितले.

You May Also Like

error: Content is protected !!