स्वस्तात मस्त! भाऊबीजेला बहिणीला द्या हे शानदार गजेट्स गिफ्ट, पाहा लिस्ट

दिवाळी सुरू झाली असून या निमित्ताने कपडे, गॅजेट्ससह इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. दोनच दिवसांनी भाऊबीज आहे. या निमित्ताने भाऊ-बहिण एकमेकांना गिफ्ट देऊन आपले प्रेम व्यक्त करत असतात. तुम्ही देखील भाऊबीजेच्या निमित्ताने गिफ्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुम्हाला अशाच टॉप-५ गॅजेट्सची माहिती देत आहोत, जे तुम्ही गिफ्ट देऊ शकता. विशेष म्हणजे या गॅजेट्सची किंमत देखील खूप कमी आहे व दररोज याचा वापर देखील करू शकता. या भाऊबीजेला तुम्ही JBL Go, AIWA ESBT 401, Boat Airdopes 121v2, Noise ColorFit 2 आणि Oppo Enco M31 हे ५ गॅजेट्स गिफ्ट देऊ शकता. कमी किंमतीत येणारे हे गिफ्ट्स तुमच्या भाऊ-बहिणीला नक्कीच आवडीतल. या गॅजेट्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
किंमतीबद्दल सांगायचे तर JBL Go स्पीकरला तुम्ही १ हजार रुपये डिस्काउंटनंतर १,६९९ रुपयात खरेदी करू शकता. JBL Go हा ब्लूटूथ स्पीकर कॉम्पॅक्ट डिझाइनसह येतो व यात नॉइस कॅन्सलेशन मायक्रोफोन दिले आहे. जर तुमच्या भाऊ-बहिणीला गाणी ऐकायला आवडत असतील तर हे त्यांच्यासाठी नक्कीच एक उत्तम गिफ्ट ठरेल. या ब्लूटूथ स्पीकरच्या बॅटरी बॅकअपबद्दल सांगायचे तर एकदा चार्ज केल्यानंतर याची बॅटरी ५ तास टिकते.
​—–AIWA ESBT 401
AIWA ESBT 401 या वायरलेस नेकबँडला तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट्सवरून डिस्काउंट्सह फक्त १,४९९ रुपयात खरेदी करू शकता. फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे तर AIWA ESBT 401 मध्ये हँड्स फ्री कॉलिंग आणि वॉइस असिस्टेंटसाठी बिल्ट इन माइक दिला आहे. बॅटरी बॅकअपबद्दल सांगायचे तर एकदा चार्ज केल्यावर याची बॅटरी ८ तास टिकते. AIWA ESBT 401 वायरलेस नेकबँडला वॉटर रेसिस्टेंटसाठी आयपीएक्स५ रेटिंग मिळाले आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ वी५.० दिले आहे.
—–Boat Airdopes 121v2
Boat Airdopes 121v2 इयरबड्सला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. १,७९१ रुपये डिस्काउंटनंतर या इयरबड्सला तुम्ही फक्त १,१९९ रुयात खरेदी करू शकता. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर Boat Airdopes 121v2 मध्ये ८ एमएम ड्राइव्हर दिले आहेत, जे शानदार साउंड प्रदान करतात. बॅटरी बॅकअपबद्दल सांगायचे तर या ट्रू वायरलेस इयरबड्सची बॅटरी सिंगल चार्जमध्ये ३.५ तास टिकते. भाऊबीजेला गिफ्ट देण्यासाठी हा चांगला पर्याय ठरेल.
—–Noise ColorFit 2
Noise ColorFit 2 फिटनेस बँडवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. ८०० रुपयांच्या डिस्काउंटनंतर या फिटनेस बँडला तुम्ही फक्त १,६९९ रुपयात घरी नेऊ शकता. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर Noise ColorFit 2 मध्ये अनेक शानदार हेल्थ फीचर्स दिले आहेत, जे तुमच्या भाऊ-बहिणीला हेल्थ ट्रॅकिंगसाठी मदत करते. फिटनेस बँड अँड्राइड आणि आयओएस दोन्ही डिव्हाइसला सपोर्ट करते. या डिव्हाइसमध्ये हार्ट रेट सेंसर, स्लीप ट्रॅकर, कॅलरीज ट्रॅक आणि ट्रॅव्हल डिस्टेंस ट्रॅकिंग फीचर्स मिळतात.
—–Oppo Enco M31
Oppo Enco M31 या वायरलेस नेकबँडला तुम्ही १,२०० रुपये डिस्काउंटनंतर फक्त १,७९९ रुपयात खरेदी करू शकता. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर Oppo Enco M31 नेकबँड डिझाइनसह येतात, जे वापरण्यास आरामदायी आहेत. यामध्ये एकदा चार्ज केल्यावर १२ तास टिकणारी दमदार बॅटरी दिली आहे. सुरक्षेसाठी हे वॉटर रेसिस्टेंट आहे. हे नेकबँड नॉइस रिडक्शन फंक्शनसह येतात, ज्यामुळे गाणी ऐकताना कोणतीही समस्या जाणवणार नाही.

You May Also Like