ऑक्सिजन तुटवड्याने महाराष्ट्राची परिस्थिती गंभीर, मुख्यमंत्री ठाकरेंचा पंतप्रधानांना 24 तासात 3 वेळा फोन

मुंबई : राज्यातील करोनाची परिस्थिती अत्यंत भयानक झाली आहे. राज्यात ऑक्सिजन तुटवड्यामुळे  परिस्थिती गंभीर बनली आहे .दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या 24 तासात तब्बल तीनवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांना फोन केला.  त्यामुळेच महाराष्ट्राला 1200 ते 1500 मेट्रीक टन ऑक्सिजन मिळावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली. या दोघांमध्ये महाराष्ट्रातील आणि मुंबईतील ऑक्सिजनचा तुटवड्याबाबत चर्चा झाली

दरम्यान, काल मुंबईतील काही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमरता होती. त्यामुळे काही रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले होते. त्यावरुनच उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना फोन करुन, महाराष्ट्रातील चिंताजनक परिस्थिती कळवली.

तसेच,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधांन नरेंद्र मोदी यांनाच फेसबुकवरून लष्कराच्या मदतीने हवाईमार्गे ऑक्सिजनचा साठा आणण्यास परवानगी द्यावी, असं आवाहन केलं होतं. उद्धव ठाकरे यांनी 13 एप्रिलला संचारबंदी जाहीर करताना, जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी ऑक्सिजन तुटवड्याची माहिती दिली होती.

तसेच, मुख्यमंत्री म्हणाले कि, पंतप्रधानांशी माझी नुकतीच बैठक झाली आहे. त्यात त्यांना ऑक्सिजनची मागणी केली आहे. इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांच्याकडे केला आहे. त्यांनी परवानगीही दिली आहे. मात्र, ईशान्येकडील राज्यातून ऑक्सिजन आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. दररोज हजारो किलोमीटरचा प्रवास करून रस्ते मार्गे हे ऑक्सिजन आणावं लागणार आहे. परंतु आपल्याला ऑक्सिजनची खूप गरज आहे. त्यामुळे रस्तेमार्गे ऑक्सिजन आणणं परवडणारं नाही. त्यामुळे लष्कराच्या मदतीने हवाईमार्गे ऑक्सिजन आणण्याची पंतप्रधानांनी परवानगी द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे केली होती.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

You May Also Like