बालकांनो सावधान! मुलांमध्ये वाढतोय करोनाचा धोका

नवी दिल्ली : गेल्या वर्षी मार्च महिन्यात करोनाचा पहिला रुग्ण राज्यात आढळून आला. साधारण एका वर्षामध्ये उत्तराखंडमधल्या 10 हजार 740 लहान आणि किशोरवयीन मुलांना करोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. पण एप्रिल या एकाच महिन्यामध्ये हा आकडा 18 हजारांच्या पुढे गेलेला आहे.
उत्तराखंडमध्ये गेल्या दीड महिन्यात 16 हजाराहून अधिक लहान मुलांना तसंच 19 वर्षांपर्यंतच्या किशोरवयीन मुलांना करोनाची लागण झाली आहे. राज्याच्या नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, 9 वर्षे वयोगटातल्या 3 हजार 20 मुलांना तर 10 ते 19 वर्षे वयोगटातल्या 13 हजार 393 किशोरवयीन मुलांना करोनाची लागण झाली आहे.
त्यामुळे आता असा प्रश्न उभा राहत आहे की, उत्तराखंडमध्ये करोनाची तिसरी लाट पोहोचली आहे का, ज्या लाटेमध्ये सगळ्यात जास्त धोका लहान मुलांना संभवतो.

दरम्याण, महामारीचा इतिहास लक्षात घेतला असता लक्षात येते की साधारणपणे तीन ते चार लाटा येतात. विषाणू सध्या आपला विस्तार करत आहे. देशात आत्ता कुठे 18 वर्षांवरच्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पण लसींच्या कमतरतेमुळे हे पूर्ण वर्ष लसीकरणासाठी लागू शकतं. आता राहिली 18 वर्षांच्या खालची मुलं. त्यांना आता करोनाचा मोठा धोका आहे.

You May Also Like