चक्क उंदरांनी केली दहशत; भारताकडून मागवले पाच हजार लिटर विष

सिडनी : एकीकडे करोना महामारीचा त्रास सहन केला जात असतानाच ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स भागामध्ये उंदरांची मोठ्या प्रमाणात दहशत असून या उंदरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियन प्रशासनाने भारताकडून तब्बल पाच हजार लिटर उंदरांना मारणार्‍या विषयाची मागणी केली आहे.

येत्या महिन्याभराचा कालावधी मध्ये या उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवले नाही तर न्यू साउथ वेलची आर्थिक व्यवस्था कोलमडून जाईल असेही त्यांनी म्हटले आहे उंदरांना नष्ट करण्याच्या उपायांचा एक भाग म्हणूनच ऑस्ट्रेलियन सरकारने भारताकडून ब्रोमेडिओलइन या विषाची मागणी केली आहे भारत सरकारने पाच हजार लिटर विषारी रसायनाचा पुरवठा करावा असे ऑस्ट्रेलियन सरकारने आपल्या मागणीमध्ये म्हटले आहे.

न्यू साउथ वेल्स या परिसरामध्ये उंदरांची संख्या गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रशासनाने या भागांमध्ये माऊस प्लेगची घोषणा केली आहे हि एक प्रकारची महामारीच मानली जाते जे उंदीर आत्तापर्यंत शेतांमधील पीक नष्ट करत होते तेच उंदीर आता घरात घुसत असून घरातही नासधूस करू लागले आहेत विजेच्या तारा चावून तोडण्याचे प्रकार वाढल्याने अनेक ठिकाणी आग लागण्याचे प्रकार घडले आहेत.

You May Also Like