सिडको : विनाकारण बाहेर पडू नका,पोलिसांकडून नाकाबंदी; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

सिडको :  करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सिडकोतील अनेक परिसरात अंबड पोलिसांकडून कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्रिमुर्ती चौक येथे नाकाबंदी करून वाहनचालकांकडे विचारपूस करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.
त्याशिवाय विनाकारण भटकंती करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाईवर भर देण्यात आला आहे.
दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ ते सायंकाळी सात असे दुकानदार तसेच नागरिकांना खरेदी विक्री करण्यासाठी वेळ घालून दिली होती. नागरिकांकडूनही बाजारपेठेतील सर्व व्यवहार सायंकाळी सात पूर्वीच बंद करून प्रशासनाला सहकार्य केले. नियम तोडणाऱ्या दुकानांवर मनपा विभागीय अधिकारी मयुर पाटील यांनी कारवाई करत काही दुकानेही सिल केली आहे.पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची वाहनांतून पेट्रोलिंग करण्यात येत आहे.वाढत असलेल्या करोनामुळे शासनाने शनिवार व रविवार पूर्णपणे लाँकडाऊन पुकरलेला आहे.
शनिवार व रविवार पुकारण्यात आलेल्या लाॅकडाऊनचे सिडकोतील सावतानगर-पवननगर-त्रिमुर्ती चौक-उत्तम नगर-अंबड परिसर-पाथर्डी फाटा भागात काटेकोरपणे पालन होत असून जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आलेल्या आहे.पोलिसांनीही  नाकाबंदी केली असून अत्यावश्यक कामासाठीच येथून वाहनाना प्रवेश देण्यात येत आहे.
शहरातील बहुतांश ठिकाणी पोलिसांना कामामुळे जेवण, पाणी व विश्रांती करण्यास वेळ मिळत नसल्याची सद्यस्थिती आहे. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या कारवाईमुळे शहरात खºया अर्थाने संचारबंदीचा प्रत्यय आला आहे.रविवारी जनता संचारबंदीच्या काळात स्वत:ला घरात कोंडून घेणाºया नागरिकांनी मात्र सायंकाळनंतर घराबाहेर पडून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याऐवजी त्याविषयी बेफिकिरीचे प्रदर्शन घडविले. सोमवारीदेखील हजारो नागरिक घराबाहेर पडल्याचे चित्र होते.सकाळपासूनच दुचाकी, चारचाकी वाहनांतून तर काहींनी पायीच गंमत पाहण्यासाठी घराबाहेर पडले.सरकारने फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची अनुमती दिलेली असताना ते बंधन झुगारून अनेकांनी आपापली दुकाने उघडून ग्राहकांना प्रोत्साहित केले होते. हजारोंच्या संख्येने जत्थेच्या जत्थे रस्त्यावर उतरल्याने आरोग्य यंत्रणेने भीती व्यक्तकेली होती.
करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता, घरातच थांबणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र नागरिकांनी स्वत:बरोबरच अन्य लोकांचाही जीव धोक्यात घालणे सुरू केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळनंतर संचारबंदी लागू केल्याची घोषणा केली. त्यामुळे रात्रीपासूनच पोलिसांना रस्त्यावर उतरून गर्दीला आवर घालण्याची कार्यवाही करावी लागली. शहरातील प्रमुख रस्ते, चौकाचौकांत लोखंडी बॅरिकेट्स टाकून थेट रस्तेच बंद करून पोलिसांनी रस्त्याचा ताबा घेतला.   दूध,भाजीपाला विक्रेत्यांना त्यातून वगळण्यात आले मात्र अन्य व्यक्तिना पोलिसांनी अटकाव केला.
शहरातील पंचवटी, सिडको,नाशिकरोड, सातपूर,पाथर्डी, अंबड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, महात्मा गांधीरोड, गोदाघाट आदी भागांतील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने शहरात संचारबंदीची परिस्थिती दिसून आली,तर याच वेळी विनाकारण फिरणाºयांना पोलिसांनी हिसकादेखील दाखविला.जीवनावश्यकवस्तू मुबलक कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी, जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये म्हणून प्रशासनाने भाजीपाला, दूध, फळे, औषधे दुकानांना त्यातून वगळल्याने नागरिकांचे हाल टळण्यास मदत झाली.शहर, परिसरात अन्य दुकाने पूर्णपणे बंद असली तरी,जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी होती व त्यात मुबलक साठादेखील होता. त्यामुळे नागरिकांना टंचाईचा सामना करण्याची वेळ आली नाही.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like