लसीकरणावर नागरिकांची शंका! अफ्रिकन देशाने जाळले तब्बल 20 हजार डोस

लिलोंग्वा : करोनाचा कहर जागतिक पातळीवर अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक लहान देशांमध्ये अद्यापही करोना लसींचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होताना दिसत नाही. आफ्रिकेतील एका देशातून वेगळाच प्रकार समोर आला आहे. देशातील नागरिकांनी करोना लसींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे नागरिकांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी या देशाने तब्बल 20 हजार करोना लसीचे डोस जाळल्याची माहिती मिळाली आहे.

या अफ्रिकन देशाचे नाव मलावी असून, या देशात जाळण्यात आलेले सर्व कोरोना लसीचे डोस एस्ट्राजेनका कंपनीचे होते. या लसींची मुदत संपली होती. नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी या लसींचे डोस जाळण्यात आले. मुदत संपलेल्या लसी जाळणारा मलावी हा पहिला आफ्रिकन देश असल्याचे सांगितले जात आहे.

मलावीमधील एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात मुदत संपलेल्या लशीचे डोस नष्ट करण्यात आले. नागरिकांमध्ये लसींबाबत शंका होती. अशातच मुदत संपलेल्या लसीचे डोस देण्यात येत असल्याचा गैरसमज नागरिकांमध्ये पसरला होता. हा गैरसमज दूर करण्यासाठी लसीचे 20 हजार डोस जाळण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

You May Also Like

error: Content is protected !!