कोरोना बचावासाठी लस प्रभावी असल्याचे महत्व आता नागरिकांना पटले

जळगाव – कोरोना बचावासाठी लस प्रभावी असल्याचे महत्व आता नागरिकांना पटले आहे अर्थात लसीकरणासाठी प्राधान्य दिले जात आहे पण जिल्हातील ग्रामिण शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक दिवस दिव्यांगाना लसीकरणाचे आयोजन राष्ट्रवादी युवती काँग्रेस करत असून तेथिल आरोग्य केंद्रात लस उपल्ब्ध करून दिव्यांगाची होत असलेली हेळसांड थांबवण्यासाठी हा उपक्रम हाती घेत आहोत लसीकरणासाठी भल्या मोठ्या रांगेत तासन तास ताटकळत थांबावे लागत आहे तरी अशा लोकासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून लसीकरण मोहीमेत दिव्यांगाना लस उपलब्ध करून व एक दिवस विशेष लसीकरण देऊन विशेष सहकार्य करावे अशी मागणी जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले,राष्ट्रवादी युवती काँग्रेस ग्रामिण कार्याध्यक्ष कोमल पाटील,जळगाव राष्ट्रवादी युवती काँग्रेस शहर अध्यक्षा आरोही नेवे यांनी केली.

You May Also Like