केवळ एका सहीसाठी नागरिक बसले ताटकळत

दुय्यम निबंधक कार्यालयातील मनमानी कारभार उघड
धुळे : संविधानातील नियमावली नूसार जमीन खरेदी तसेच विवाहाची नोंदणी करणे आवश्यक बाब आहे. शहरातील संतोषी माता मंदिर ते गणपती मंदिर रोड लगत दुय्यम निबंधक कार्यालय आहे. या ठिकाणी नोंदणी करणे क्रमप्राप्त आहे. जिल्हाभरातून अनेक नागरीक व नवविवाहित दाम्पत्य नोंदणीसाठी येतात. आवश्यक असलेली कागदपत्रे सोबत घेऊन बसलेल्या नागरीकांना प्र. सह दुय्यम निबंधक अधिकारी वर्ग/2 अंबादास पवार सकाळपासून गायब झाल्याने केवळ एका सहीसाठी चातका सारखी वाट पहावी लागली. शासकीय अधिकारी असल्यामुळे आपलं कोणी काहीच करू शकत नाही अशा अर्विभावात फिरणारे अधिकारी पवार दुपारी 4 वाजता प्रकट झाले.

सरकारी काम आणि सहा महिने थांब या म्हणीला तंतोतंत लागू पडणारे कामकाज शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकार्‍यांकडून केले जात आहे. आणि यासंदर्भात संतप्त भावना नागरीकांमधून उमटणं सहाजीक आहे. सकाळी कार्यालयात न येता दुपारी 4 वाजता अधिकारी येत असतील तर अधिकार्‍यांवर कोणाचेही बंधन नसल्याचे पुन्हा उघड झाले आहे. याच दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकार्‍यांपासून शिपाई पर्यंत वरचेवर रक्कम उकळली जात असल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा आजही केली जाते.

काही शासकीय कार्यालय म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असल्याचे काहींच्या लक्षात आल्याने नागरीकांची नोंदणीची कामे करून देण्यासाठी एजंटांची फौज या ठिकाणी कार्यरत आहे. असाच प्रकार भुमापन कार्यालयांमध्ये अधिकार्‍यांचे चालते की, एजंटांचे ? असा भितीदायक प्रश्न नागरीकांना पडला आहे. करोनाच्या काळात खरेदी-विक्रीचे व्यवहार, विवाहांचे कमी प्रमाणात झाल्याने महसूल कमी झाला. विवाह नोंदणीसाठी 150 रूपये शुल्क आकारणी केली जाते. तसेच खरेदी विक्रीच्या नोंदणीसाठी पूर्वी केवळ 3 टक्के शुल्क आकारले जात होते. शासनाने आता वाढवून 5 टक्के केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी महसूल कमीच झाला असल्याचे प्र.सह दुय्यम निबंधक वर्ग/2, वर्ग-1 अंबादास पवार यांनी सांगितले.

You May Also Like

error: Content is protected !!