मुख्यमंत्री एक्झिट मोडमध्ये?, मंत्रालयाला करणार ‘जय महाराष्ट्र’?; आज मंत्रालयातील सचिव आणि कर्मचाऱ्यांसोबत बैठक

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर गेल्या २ दिवसांपासून राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधल्यानंतर त्यांनी वर्षा हे निवासस्थान सोडून थेट मातोश्री गाठली. तसेच, एकनाथ शिंदे हे शिवसेनेवरच दावा ठोकणार असल्याची माहिती पुढे येत आहे. शिंदेंएकडे शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आहेत, त्यामुळे शिंदे गट शिवेसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा करणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटच शिवसेना आहे, असा दावा शिंदे गट निवडणूक आयोगाकडे करणार असल्याची माहिती आहे.

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात मंत्रालयातील सगळ्या सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतील. अडीच वर्ष केलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री आभार व्यक्त करणार आहेत.

त्यामुळे उद्धव ठाकरे आता काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. त्यातच आता मुख्यमंत्री हे मंत्रालयातील सर्व सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. सचिव आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या सहकार्याबाबत ते आभार मानणार आहेत, सदर बैठक मंत्रालय अंतर्गत असल्यामुळे याचे प्रक्षेपण करता येणार नाही, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हे एक्झिटच्या मोडमध्ये आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. मुख्यमंत्र्यांकडून लवकरच कुठला मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री राजीनामा देणार असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like