coronavirus : राज्यात विभागवार फिव्हर क्लिनिकची उभारणी करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात मुंबई आणि पुण्यात करोनाचा रुग्ण सापडल्यानंतर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्याला काल चार आठवडे पूर्ण झाले. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. राज्यातील करोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांची चार प्रकारात वर्गवारी करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यापैकी पहिल्या टप्प्यात विभागवार फिव्हर क्लिनिकची उभारणी करण्यात येईल. लवकरच सर्व नागरिकांना या क्लिनिक्सची माहिती दिली जाईल. याठिकाणी सर्दी, खोकला आणि ताप असलेल्या लोकांना तपासणी करून घेता येईल.

राज्यात आतापर्यंत करोनामुळे ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई, पुण्यात चाचण्यांची संख्या वाढविलेली आहे. रॅपिड टेस्टबाबत विचार सुरु आहे. ज्यावेळी रॅपिड टेस्ट किटला परवानगी मिळेल तेव्हा ती जास्तीत जास्त प्रमाणात महाराष्ट्रात आणल्यानंतर चाचण्यांना सुरुवात होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.