महाराष्ट्रासाठी दिलासादायक ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची बातमी

मुंबई : काही दिवसांपूर्वी  सर्वात जास्त करोना रुग्ण असलेल्या देशातील महाराष्ट्रातील करोना रुग्ण वाढीचा दर हा अतिशय चिंतादायक होत. त्यामुळे रुग्णांना अनेक समस्येंना सामोरे जावे लागले. आरोग्य सेवेंच्या तुटवड्यामुळे तर रुग्णांना आपले प्राण हि गमवावे लागले.

दरम्यान, देशातील सर्वाधिक करोनाचा प्राधुर्भाव असलेल्या दहा जिह्यांपैकी तर महाराष्ट्रातीलच 8 ते 10 जिल्हे होते. त्याच महाराष्ट्राबाबत केंद्राने आता दिलासादायक बातमी दिली आहे. राज्यातील कोरोना प्रकरणं कमी झाली आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने  दिली आहे.

देशातील करोना परिस्थितीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी काही राज्यांमध्ये कोरोनाची नवीन प्रकरणं कमी झाल्याचं सांगितलं आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्यांचा समावेश आहे. तसेच,  27 एप्रिल, 2021 पासून महाराष्ट्रातील करोना रुग्णसंख्येचा आलेख घसरता आहे. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रकरणं घटल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like