ओमायक्रॉनने वाढवल्या चिंता, या महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट?

मुंबई : कोरोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉन हे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण ठरणार आहे. फेब्रुवारी महिन्यात तिसरी लाट शिगेला पोहोचेल. या काळात भारतात दररोज एक ते दीड लाख लोकांना संसर्ग होणार असा दावा आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी त्यांच्या गणितीय मॉडेलच्या आधारे केला आहे.
मनिंद्र अग्रवाल यांनी त्यांच्या अभ्यासात दावा केला आहे की, ओमायक्रॉन प्रकारामुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट जानेवारीमध्ये सुरू होईल आणि फेब्रुवारीपर्यंत ती शिखरावर पोहोचेल. जरी त्यांनी असा दावा केला असला तरी त्याचा संसर्ग खूप सौम्य असेल. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. पद्मश्री प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनीही त्यांच्या गणनेतून कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अंदाज लावला होता. तो बरोबर सिद्ध झाला.
सध्या ते आयआयटी कानपूर येथे कॉम्प्युटर सायन्स विभागात प्राध्यापक आहेत. ज्या गणितीय मॉडेलच्या आधारे त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला होता, त्याच मॉडेलच्या आधारे त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते, तिसरी लाट जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येईल आणि फेब्रुवारीपर्यंत ती शिगेला पोहोचेल.

You May Also Like