अभिनदंन अभिमन्यू! 12 व्या वर्षी झाला ग्रँडमास्टर

मुंबई : भारतीय वंशाचा अमेरिकी मुलगा अभिमन्यू मिश्रानं मोठा इतिहास रचला आहे. न्यू जर्सी येथील रहिवासी अभिमन्यू जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनला आहे. त्याने (12 वर्ष 4 महिने आणि 25 दिवस) इतक्या कमी वयामध्ये ग्रँडमास्टर होण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. अभिमन्यूनं रशियाच्या सर्गेई कर्जाकीम (12 वर्ष 7 महिने) रेकॉर्ड मोडला आहे. बुडापेस्टमध्ये झालेल्या ग्रँडमास्टर स्पर्धेत अभिमन्यूनं भारतीय ग्रँडमास्टर लिऑन मेनडोन्का याला पराभूत करत हा विक्रम केला.

याबाबत, अभिमन्यूमध्ये असमान्य गुणवत्ता असल्याची आमची खात्री होती. तो जे काही पाहतो ते त्याला लक्षात राहते. त्याला आजही 2014 किंवा 2015 साली झालेल्या मॅचमधील चाली लक्षात आहेत, असे प्रसाद म्हणाले.

अभिमन्यूचे वडील हेमंत मिश्रा न्यू जर्सीमध्ये डेटा मॅनेजमेंटचं काम करतात अभिमन्यू अडीच वर्षाचा होता तेव्हाच त्यांनी त्याला हा खेळ शिकवला. त्याने पाचव्या वर्षापासूनच स्थानिक स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली. अभिमन्यूनं सुरुवातीपासूनच त्याच्या वडिलांच्या वयाच्या खेळाडूंना हरवण्यास सुरुवात केली. त्याने वयाच्या नवव्या वर्षी 70 वर्षांच्या अनुभवी खेळाडूला पराभूत केले होते, अशी आठवण त्याचे कोच अरुण प्रसाद यांनी सांगितली.

You May Also Like