मीराबाईच्या सोनेरी कामगिरीनंतर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव

नवी दिल्ली ।  १८९६च्या पहिल्या ऑलिम्पिकपासून पुरुषांसाठी वेटलिफ्टिंग हा खेळ अस्तित्वात आहे. पण २०००च्या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच महिलांसाठी वेटलिफ्टिंगचे पदकांचे द्वार खुले झाले अन् आंध्र प्रदेशमधील एका छोटय़ाशा गावातील मल्लेश्वरीने भारतासाठी कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतीय महिलेने प्राप्त केलेले हे पहिले पदक म्हणून सुवर्णाक्षरांनी अधोरेखित झाले. या यशानंतर मणिपूरसारख्या गावातून आता मीराबाईच्या रूपात आशेची किरणे दिसू लागली आणि आज मीराबाईने सोनेरी कामिगिरी करत देशाचे नाव उंचावले आहे. देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

 

You May Also Like

error: Content is protected !!