काँग्रेस नेते राहुल गांधी यांना करोनाची लागण

मुंबई, 20 एप्रिल :सध्या  देशभरात करोनाचा हाहाकार  सुरू असून रुग्णसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्याची स्थिती हि हाताबाहेर आहे. या दरम्यान अनेक नेते मंडळीना देखील करोनाने गाठले आहे.

अशातच आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनाही कोरोनाची लागण  झाली आहे. राहुल गांधी यांनी स्वत: याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.

‘सौम्य लक्षणे जाणवल्यानंतर चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नजीकच्या काळात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी,’ असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.

 

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like