कोविड नियमांचे उल्लंघन प्रकरणी काँग्रेस आमदारासंह, नेत्यांवर गुन्हे दाखल

जळगाव : प्रदेश कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे यांचा जळगाव दौरा नुकताच पार पडला. या दौर्‍यात कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार, नेत्यांसह 25 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलायं.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे यांचा तीन दिवसांपूर्वी जळगाव येथे दौरा झाला. यात अजिंठा विश्रामगृहात पक्षाची पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेण्यात आली. कोरोनामुळे संचार बंदी, राजकीय सभा, बैठक घेण्यास बंदी असतांना देखील यावेळी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात गर्दी विश्रामगृहात झाली होती. त्यावरून काँग्रेस आमदारांसह नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलायं.

You May Also Like