खासगीशाळेच्या मनमानी फीस पासून विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा

जळगाव : खासगीशाळेच्या मनमानी फीस पासून विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा मिळावा म्हणून महाराष्ट्र स्टुडंन्स्ट युनियन (मासू) च्या वतीने जिल्हाधिकारी याना निवेदन देण्यात आले. या निवेदनात महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन यांचे म्हणणे होते की कोविड 19 च्या या पार्श्वभूमीवर जे आर्थिक संकट आले आहे. त्यात सामान्य माणूस होळपळून निघाला आहे. अशातच काही खासगीशाळा ह्या मनमानी पध्दतीने आधी ज्या प्रकारे फीस आकारात होते त्याच पद्धतीने आता आकारून त्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे. लाँकडाऊन मुळे गेल्या अडीच वर्षा पासून सर्वे काम घरूनच चालू आहे. ऑनलाईन लेक्चर्स चालू आहे.त्यात ही शाळा ह्या इतर वेळी जितकी फीस घेतात तेवढीच फी आता ही आकारत आहेत. पालकांनी का म्हणून इतर फीस द्यायची,तसेच सर्व सामान्य पालक आपल्या पल्यांना आपलेच पैसेखर्च करून मोबाइलला ला रीचार्ज करून आपल्या पोटाला चिमटा घालून शाळेची इतकी फीस भारत आहे तरी खासगी शाळांची ही अवाजवी फीस कमी करून फक्त ट्युशन फीस घ्यावी आणि विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांची ही आर्थिक गळचेपी थांबवावी अन्यतः महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन तर्फे तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी विभाग प्रमुख अँड.अभिजित जितेंद्र रंधे, उत्तर महाराष्ट्र प्रदेश कमिटी दीपक सपकाळे, विभाग उपाध्यक्ष
सचिन बिऱ्हाडे , विभाग साचीव चेतन चौधरी , संदीप कोळी,
रोहन महाजन आदी उपस्थित होते…

You May Also Like

error: Content is protected !!