जवळपास दीड वर्ष कोरोना ठाण मांडून बसलाय. तो जायचं काही नाव घेईना

पुणे : गेली जवळपास दीड वर्ष कोरोना ठाण मांडून बसलाय. तो जायचं काही नाव घेईना. त्याच्यात शासन वारंवार लॉकडाऊनचा निर्णय घेत आहेत. अशा काळात घरातून काम केल्यावाचून पर्याय नाही. देशाच्या विविध भागांत लोक वर्क फ्रॉम होम करतायत. पुण्यात तर मोठा औद्योगिक पट्टा आहे. हिंजवडीसारखं देशातलं मोठं आयटी पार्क आहे. त्यामुळे पुणे शहरात वर्क फ्रॉम होम करणारांची संख्याही मोठी आहे. परंतु आता याच वर्क फ्रॉम होममुळे पुरुषांना बायकांच्या छळाला सामोरं जावं लागतंय. बायकोकडून नवऱ्याला मारहाण, मानसिक आणि शारिरिक छळाचे प्रकार वाढले आहेत. पुण्यातील जवळपास दीड हजार नवरोबांनी पोलिसांत बायकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.

पुणे पोलिसांचा भरोसा कक्ष आहे. या कक्षात जवळपास दीड हजारांहून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये बायका मानसिक, शारिरिक छळ करत असल्याचं नवरोबांनी नमूद केलंय. टाळेबंदीच्या काळात जवळपास 3 हजारांहून अधिक तक्रारी दाखल आहेत. त्यातील जवळपास दीड हजार नवरोबांनी बायकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.

लॉकडाऊन काळात कौटुंबिक कलहाची झळ पुरुषांनाही बसली आहे. दीड वर्षात 1 हजार 135 पुरुषांनी पत्नी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत.
महिलांच्याही पती विरोधात दीड वर्षात जवळपास पंधराशेवरुन अधिक तक्रारी आहेत. मात्र यंदा पत्नी विरोधात तक्रारी देण्याचे प्रमाण वाढलं आहे. वर्क फ्रॉम आणि कोरोनाचं संकट असल्याने लोकं घरातच थांबत आहेत. त्याच नवरा-बायकोचे छोट्या-मोठ्या कारणांवरुन वाद होत आहेत. हे वाद विकोपाला जात आहेत. त्यामुळे कौटुंबिक कलहात वाढ झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

You May Also Like

error: Content is protected !!