बालसुधारगृहातही करोनाचा शिरकाव; उल्हासनगरमध्ये 14 मुलं करोना बाधित

उल्हासनगर । रोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देशातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेली होती. अगदी तुरुंगात बंद असलेल्या कैद्यांना देखील करोना विषाणूची बाधा झाली होती. त्यामुळे करोना प्रादुर्भाच्या काळात अनेक कैद्यांना तात्पुरता जामीन देऊन घरी पाठवण्यात आलं होतं. यानंतर आता बालसुधारगृहात देखील करोना विषाणूनं शिरकाव केला आहे.

 

 

उल्हासनगर येथील बालसुधारगृहात शिक्षा भोगत असलेल्या 14 मुलांना करोनाची बाधा झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये 4 मुलं अपंग आहेत. महापालिकेकडून आयोजित करण्यात आलेल्या मेडिकल कॅम्पमध्ये संबंधित मुलं करोना बाधित आढळली आहे. संबंधित सर्व करोनाबाधित मुलांना कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. बालसुधार गृहातील मुलं करोनाबाधित आढळल्यानं महापालिका प्रशासनं सतर्क झालं आहे.

You May Also Like