नाशिक जिल्ह्यात करोनाचा विळखा वाढतोय; आज इतके रुग्ण

नाशिक | गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वाढत आहे. जिल्ह्यात दिवसभरात २४ जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. तर मागील चोवीस तासात २० रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या अहवालानुसार मागील चोवीस तासात एकूण २४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये नाशिक मनपा क्षेत्रातील १४ रुग्ण, नाशिक ग्रामीण क्षेत्रातील ७ रुग्ण तर, जिल्हाबाह्य ३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आज करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही.

नाशिककरांनी काळजी घ्यावी, कोरोनाच्या लढाईसाठी फिजीकल डिस्टन्स, मास्क लावणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे या त्रिसूत्रीवर भर द्यावा लागणार आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

 

You May Also Like