देशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे

नवी दिल्ली – देशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. मास्क न लावल्यास दंड वसूल केला जात आहे. याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. गुजरातमधील सुरतमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. मास्क लावला नाही म्हणून पोलीस हवालदाराने आपल्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. मास्क न घालता फिरत असल्याच्या कारणावरुन या हवालदाराने पीडित महिलेला ताब्यात घेतलं होतं. सुरत येथील उमरपाडा पोलीस स्थानकामध्ये हा हवालदार कार्यरत आहे.

मास्क घातलं नाही म्हणून कठोर कारवाई करेन अशी धमकी देत हवालदार मला त्याच्यासोबत घेऊन गेल्याचा आरोप या महिलेने केला आहे. त्यानंतर या हवालदाराने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर पुढे अनेक महिने तो माझ्यावर वारंवार बलात्कार करायचा असं देखील म्हटलं आहे. महिलेने हवालदारावर बलात्काराचा आरोप केलेला असतानाच हवालदाराच्या पत्नीने पीडित महिला जातीवरुन आरोप करत असल्याचा दावा केला आहे. नरेश कपाडिया असं असं आरोप करण्यात आलेल्या पोलिसांचं नाव आहे. त्यामुळेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

You May Also Like