कोरोनामुळे पुन्हा तिघांचा मृत्यू; नाशिक जिल्ह्यात किती आहेत रुग्ण?

नाशिक । नाशिकमध्ये कोरोनामुळे होणारे मृत्यूसत्र थांबताना दिसत नाही. ओमिक्रॉन विषाणूमुळे रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण कमी झाले. मात्र, गंभीर रुग्ण शेवटचा श्वास सोडताना दिसत आहेत. 9 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात पुन्हा एकदा 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात एक रुग्ण नाशिक महापालिका हद्दीतील असून, 2 ग्रामीण भागातील आहेत. नाशिकसह निफाड, सिन्नर, कळवणध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज 10 फेब्रुवारी रोजी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 61 हजार 597 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 3 हजार 55 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 675 ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 8 हजार 856 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
—–कोठे आहेत रुग्ण?
उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 143, बागलाण 112, चांदवड 99, देवळा 116, दिंडोरी 110, इगतपुरी 32, कळवण 146, मालेगाव 46, नांदगाव 124, निफाड 301, पेठ 82, सिन्नर 286, सुरगाणा 120, त्र्यंबकेश्वर 69, येवला 110 असे एकूण 1 हजार 894 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 1 हजार 31, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 39 तर जिल्ह्याबाहेरील 89 रुग्ण असून असे एकूण 3 हजार 50 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 73 हजार 508 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधितांमध्ये नाशिक 35, बागलाण 10, चांदवड 1, देवळा 1, दिंडोरी 35, इगतपुरी 4, कळवण 1, मालेगाव 6, नांदगाव 2, निफाड 15, सिन्नर 11, त्र्यंबकेश्वर 1, येवला 6 असे एकूण 128 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
—–रुग्ण बरे होण्याची टक्केवारी किती?
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 96.48 टक्के, नाशिक शहरात 98.12 टक्के, मालेगावमध्ये 97.09 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.39 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.48 टक्के इतके आहे. नाशिक ग्रामीणमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 4 हजार 283 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 83, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 364 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 856 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
9 फेब्रुवारी रोजी कळविलेले मृत्यू
– नाशिक मनपा – 01
– मालेगाव मनपा – 00
– नाशिक ग्रामीण – 02
– जिल्हा बाह्य – 00
नाशिक जिल्ह्याचे चित्र
– एकूण कोरोना बाधित 4 लाक 73 हजार 508
– 4 लाख 61 हजार 597 जण आतापर्यंत बरे
– सध्या जिल्ह्यात 3 हजार 55 पॉझिटिव्ह रुग्ण
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.48 टक्के

You May Also Like