लाळ वापरून होणार करोना रॅपिड एंटीजन चाचणी

टोकियो : करोना चाचणीच्या दिशेने एक मोठे यश हाती लागले आहे. वैज्ञानिकांनी लाळेच्या नमुन्यातून करोना चाचणी करण्यास यश मिळवले आहे. लाळेच्या माध्यमातून अधिक वेगाने व अचूक करोना चाचणी करणे शक्य होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. जपानच्या होक्काइडो विद्यापीठाच्या वैज्ञानिकांच्या एका पथकाने आरटी पीसीआरच्या तुलनेत परीक्षणातील दक्षता आणि अचूकता याचे आकलन करण्यासाठी जून 2000 मध्ये जपानी कंपनी फुजिरेबियोद्वारे विकसित करण्यात आलेली एक एंटीजन किट, लुमिपल्स एसआरएस कोव-2 एजी किट याचा वापर करण्यात आला.

लाळेद्वारे चाचणी केल्यास त्याचे फायदे अधिक चांगले आहेत. ही त्वरीत होणारी चाचणी असून आरोग्य कर्मचारी विषाणूच्या संपर्कात येण्याचा धोका कमी आहे. महासाथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिकाधिक चाचणी करण्याच्यादृष्टीने ही करोना चाचणी महत्त्वाची ठरू शकते.

लाळ चाचणीतून समोर आलेल्या निष्कर्षानुसार एंटीजन डिटेक्शन किट, ज्याचा वापर केमिलुमिनसेंट एंझाइम इम्यूनोससाठी (सीएलईआयए) करण्यात येतो. त्याद्वारे 35 मिनिटांमध्ये अधिक अचूकपणे करोनाची लागण झाली आहे का, याची चाचणी करता येते. हे संशोधन मद लँसेंट मायक्रोबफ नियतकालिकेत प्रकाशित झाले आहे. वैज्ञानिकांनी तीन गटांमध्ये एकूण 2056 जणांची चाचणी केली.

 

You May Also Like

error: Content is protected !!