वुहानमधूनच करोनाचा फैलाव? तीन संशोधक पडले होते आजारी

नवी दिल्ली : चीनमधूनच करोनाचा फैलाव झाल्याचा अनेक देशांचा आरोप असून चीनकडुन आरोप फेटाळण्यात आलंय. दरम्याण, एक धक्कादायक माहिती समोर आलीयं. वुहानच्या ज्या प्रयोगशाळेतून करोनाचा फैलाव झाल्याचा दावा केला जात आहे तेथील तीन कर्मचार्‍यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी जगाला करोना संसर्गाची कोणतीही कल्पना नव्हती.

वॉल स्ट्रीट जर्नललच्या रिपोर्टच्या माहितीनुसार, चीनने जगासमोर करोनाची माहिती जाहीर करण्याआधी नोव्हेंबर 2019 मध्ये वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या तीन कर्मचार्‍यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रिपोर्टनुसार तिन्ही कर्मचार्‍यांमध्ये करोनासारखी लक्षणं होती. यामध्ये अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या रिपोर्टचा उल्लेख करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2019 नंतरच डिसेंबर-जानेवारीदरम्यान जगाला करोना महामारीची माहिती देण्यात आलीयं.

वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टमध्ये नेमक्या किती संशोधकांना लागण झाली, त्याची वेळ, त्यांच्या रुग्णालयातील कालावधी यांची माहिती देण्यात आली असून यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या तपासात मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. करोनाचा फैलाव नेमका कुठून झाला यासंबंधी जागतिक आरोग्य संघटना तपास करत आहे. यासाठी त्यांचं एक पथक वुहानमध्येही गेलं होतं. जागतिक आरोग्य संघटना तपासातील पुढचा टप्पा निश्चित करत असतानाच ही माहिती समोर आली आहे.

 

You May Also Like