मासिक पाळीच्या काळात करोना लस घेऊ नये, व्हायरल मेसेज खरा की खोटा?

मुंबई : केंद्र सरकारने येत्या 1 मे पासून देशभरात 18 वर्षावरील लोकांना करोना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.महिलांनी मासिक पाळीच्या  काळात करोना लस घेऊ नये, असा एक मेसेज व्हायरल होत आहे. यात असा दावा केला जात आहे.

महिलांसाठी विशेष सूचना – येत्या 1 मे पासून 18 वर्षावरील व्यक्तींना लसीकरणाची मोहिम सुरु होणार आहे. परंतु महिलांसाठी हे महत्त्वाचे आहे की मासिक पाळीची तारीख आणि कधी घ्यावे हे समजूनच लसीकरणाचा निर्णय घ्यावा…

मासिक पाळीच्या पाच दिवस अगोदर किंवा पाच दिवसानंतर लसीकरण करु नये. कारण त्यावेळेस आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता फार कमी झालेली असते. लसीकरण हे सुरुवातीला आपाली रोगप्रतिकारक क्षमता कमी करते आणि नंतर ते खूप झपाट्याने वाढवते. जेव्हा आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी असते तेव्हा कोरोना लागण होण्याची शक्यता वाढू शकते. म्हणून ही खबरदारी घ्यावी.

कृपया ही माहिती आपल्या घरात, मित्रांना आणि नातेवाईकांना अवश्य सांगा…लसीकरणाला देऊ साथ… कोरोनावर करु मात…, असे यात म्हटले आहे. याबाबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, या मेसेजमधील दावा खरा आहे की खोटा? याची माहिती घेतली असता हा दावा खोटा असल्याचे समोर आलं आहे. अफवांपासून लांब राहा!, असे आवाहन मुंबई महापालिकेने दिले आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like

error: Content is protected !!