CoronaVirus : धुळे जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण करोना मुक्त; आतापर्यंत १८ जणांना मिळाला डिस्चार्ज

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दिला डिस्चार्ज

धुळे : करोना विषाणूवर (COVID 19) मात करीत धुळे जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण आज सायंकाळी आपल्या घरी परतला. तो शिंदखेडा तालुक्यातील रहिवासी आहे. त्याला श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण १८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

धुळे जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास, महसूल, बंदरे, खार विकास जमिनी, विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभाग दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. तरी नागरिकांनी करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी. शारीरिक अंतर ठेवावे. नागरिकांनी घरातच सुरक्षित राहावे. अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह जिल्हाधिकारी श्री. यादव, पोलिस अधीक्षक श्री. पंडित यांनी केले आहे.

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.