CoronaVirus: दोन बड्या कंपन्यांचे सीईओ धावले भारताच्या मदतीला

नवी दिल्ली : देशात करोनानची  दुसरी लाट आली असून, संपूर्ण आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली आहे. परिस्थिति आता हाताबाहेर गेल्याचे चित्र स्पष्ट होतय. दरम्यान, अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.अशावेळी अमेरिकेच्या दोन बड्या कंपन्या, ज्यांचे सीईओ भारतीय आहेत त्यांनी मोठी मदत देऊ केली आहे.

मायक्रोसॉफ्ट आणि गुगलने या मदतीची घोषणा केली आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी अत्यंत दु:खी असल्याचे म्हटले आहे. तसेच कंपनीची सारी ताकद भारतासाठी लावणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन Google ने आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी भारताच्या मदतनिधीमध्ये १३५ कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे.

तसेच, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी, भारतातील करोना परिस्थिती पाहून आपले हृदय दुखावले असल्याचे म्हटले आहे. भारतात दिवसाला लाखो रुग्ण सापडू लागले आहेत. आपली कंपनी भारतीयांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपले तंत्रज्ञान आणि ऑक्सिजन यंत्रणा खरेदीसाठी मदत करणार असल्याचे सांगितले.

 

तसेच, अमेरिकेचीच आणखी एक कंपनी गुगल आणि अल्फाबेटचे भारतीय वंशाचे सीईओ सुदर पिचाई यांनी देखील युनिसेफच्या भारतासाठीच्या मदतीच्या फंडामध्ये आपली कंपनी १३५ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली.

 			

You May Also Like