coronavirus : वृत्तपत्रांच्या गळेकापू स्पर्धेमुळे विक्रेते, वाचकांच्या आरोग्याचे काय ?

धुळेे : बिल्डींग मध्ये अथवा चाळीत किंवा कॉलनीत जिथे भाजीवाला व दूधवाल्या देखील येऊ दिले जात नाही तीथे आम्हाला वृत्तपत्रांची सध्या तरी गरज नाही. जगातील सगळी माहिती आम्हाला मोबाइल आणि टीव्हीवर व्यवस्थीत मिळतेय. आमच्या दृष्टीने सगळेच विश्वासार्ह आहेत फक्त सोशल मिडिया सोडून. सर्व टीव्ही चॅनल्स व वृत्तपत्रांची पत्रकारांची पोर्टल मिनिटा मिनिटाला मोबाइल वरून उत्तम प्रकारे अपडेटस् देत आहेत.

संपुर्ण दुनिया मोबाइल, टीव्हीवर असतांना लोकांच्या जीवाशी खेळ नको तुमचे पेपर मोबाइल वर, नेट वर टाका. ते आम्ही वाचू तुमच्या जीवघेण्या, गळेकापू स्पर्धेमुळे पेपर वितरकांचा जीव धोक्यात घालू नका सामान्य माणसाला आपला जीव प्यारा आहे. त्यामुळे सध्यातरी आम्हाला वृत्तपत्र नकोय.
आम्हाला कोणत्याही डब्ल्यूएचओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनचे प्रमाण पत्र नकोय. करोना व्हायरस आला तेव्हा डब्ल्यूएचओवाले झोपले होते काय. डब्ल्यूएचओवाले एकीकडे वारंवार हात धुवायला सांगतात. हातांना वारंवार सॅनेटायझर लावायला सांगतात. मग वृत्तपत्रे किती वेळा सॅनेटायझरने धुवायची ते का नाही सांगत. रात्री 12 वाजता छापली जाणारी वृत्तपत्रे वितरकांच्या माध्यमातुन सकाळी 8 पर्यंत ग्राहकांपर्यंत पोहचतात मग या सहा ते आठ तासात यांच्यावर करोनाचा कोणताही प्रभाव पडत नाही हेही डब्ल्यूएचओला मॅनेज करून वदवून घ्या. काय चाललय हे. एकीकडे वर्तमान पत्रात काम करणारी सर्व बुध्दीजीवी संपादक मंडळी रोज दुनियेला, वैचारीक, सामाजिक डोस पाजतात मग आता कुठे गेली आपली समाजाबद्दलची आपुलकी.

सकाळ सकाळी लोक मताचा आव आणून त्यांच्या आरोग्यास दिव्य खाईत लोटण्याचे पुण्यपाप आता तरी करू नका अशी विनंती आहे. खरं तर आपले लक्ष महाराष्ट्राच्या जनतेच्या आरोग्यावर असायला हवं पेपर वितरण करणारा 200/500 घरांपर्यंत पोहचतो त्यांची संख्या मोठी आहे. तसेच वाचकांची संख्याही करोडोंच्या घरात आहे. सगळ्यांचा जीव धोक्यात घातला जातोय याचा विचार आता वाचकांनीच करावा व सध्या आम्हाला पेपर नको असेच आता ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. या पत्रानंतर आणखीन काही पत्र पंडित आपली अक्कल पाजळायचा प्रयत्न करतील त्यांना वृत्तपत्र नाकारून त्यांची जागा दाखवाच. पुण्यपापाचे पुढारपन आतातरी करू नका. वृत्तपत्रा ची विश्वासार्हता आहे व राहिलही परंतु विक्रेते, वाचकांच्या आरोग्याचे काय ? महिना पंधरा दिवस थांबल्याने काही फरक पडत नाही.

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.