कोव्हॅक्सिन घेणार्‍यांना परदेशात प्रवेश नाही?

नवी दिल्ली : भारत बायोटेकमध्ये तयार झालेली कॉव्हॅक्सिनची लस घेणार्‍यांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवास करणं सध्या अवघड होऊ शकतं. डब्लुएचओच्या आपात्कालीन यादीत सामील नसल्यानं ही लस घेणार्‍यांना इतर देशांमध्ये प्रवेश करण्यात अडचणी येऊ शकतात. अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवेश धोरणं जाहीर केली आहेत. तर, काही देश लवकरच नवे नियम जाहीर करतील.

संघटनेनं आतापर्यंत कोव्हॅक्सिनचा एणङ मध्ये समावेश केलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, याचा एणङ मध्ये समावेश कऱण्यासंदर्भात मे-जूनमध्ये मीटिंगचं आयोजन करण्यात आलं आहे. यानंतर या लसीचा समावेश करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र, यासाठीच्या कामाला भरपूर वेळ लागू शकतो.

अनेक देश अशाच लसींना परवानगी देत आहेत, ज्यांना त्यांच्या नियामकाने मान्यता दिली आहे किंवा डब्ल्यूएचओच्या यादीमध्ये त्यांचा समावेश आहे. सध्या या यादीत सीरम इनस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड, मॉडर्ना, फाइजर, एस्ट्राजेनेका (2), जेनसेन आणि सिनोफार्म/बीबीआयपी या लशींचा समावेश आहे.

इमिग्रेशन एक्सपर्ट विक्रम श्रॉफ यांचं असं म्हणणं आहे, की जर लसीचा समावेश नसेल किंवा विदेशात याला मंजुरी मिळाली नसेल तर अशी लस घेतलेल्या प्रवाशांचं लसीकरण झाल्याचं मान्य केलं जाणार नाही. सध्या भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला परवानगी मिळाली आहे. याशिवाय रशियाच्या स्पूतनिकव्ही या लशीच्या वापरालाही परवानगी मिळाली आहे.

You May Also Like