”महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे”

मुंबई : नाशिक मधील रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे ऑक्सिजन अभावी २९ करोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ताजी असतानाच,  कोविड सेंटरला आग लागून १३ करोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना महाराष्ट्रात घडली.

विरारमधील एका रुग्णालयातील कोविड सेंटरला आग लागली. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये ही आग लागली. येथील कोविड सेंटरमध्ये एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आगीनंतर रुग्णालयातील अन्य रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची तर जखमींच्या कुटुंबीयांना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यावरून आता भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यावरून हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. “महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी” असं म्हटलं आहे. तसेच राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे असं देखील ते म्हणाले आहेत.

तसेच, “महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी. महाराष्ट्रातील सर्व कोविड केंद्रामधील ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तातडीने करण्यात यावं. यासाठी या श्रेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे” असं मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलं आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like