कोविशिल्ड लसीच्या दरात कपात,आदर पुनावाला यांची घोषणा

पुणे : सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने आपल्या कोविशिल्ड या लसीची किंमत आता १०० रुपयांनी कमी केली आहे. पूर्वी ही लस राज्य सरकारांना ४०० रुपयांना मिळत होती. आता ती ३०० रुपयांना मिळणार आहे. सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी ही माहिती दिली आहे.

आदर पुनावाला यांनी ट्विट करत कोविशील्ड लसीच्या किमती कमी करत आहोत. राज्य सरकारासाठी कोविशील्डच्या एका लसीच्या डोसची किंमत 400 वरुन 300 रुपये करत आहोत, अशी घोषणा आदर पुनावालांनी दिली. लसीच्या कमी केलेल्या किमती तात्काळ लागू होतील. कोविशील्डच्या लसीची किंमत कमी केल्यानं देशातील नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी मदत होईल, असं पुनावाला म्हणाले. असे असले तरीही मात्र, खासगी रुग्णालयांना या लसीसाठी पूर्वीचीच किंमत म्हणजे ६०० रुपयेच मोजावे लागणार आहेत.

दरम्यान, देशभरात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र, देशात अनेक ठिकाणी लसींची कमतरता भासत आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like