भारतीय किसान युनियनच्या 200 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल!

नवी दिल्ली : दिल्ली व उत्तर प्रदेशच्या सीमेवर गाझीपूर येथे भाजपचे कार्यकर्ते आणि कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करत असलेल्या आंदोलकांमध्ये काल(बुधवारी) हाणामारी झाली. ज्यामध्ये दोन्ही बाजूचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले. याप्रकरणी आता पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली असून, भारतीय किसान युनियनच्या 200 कार्यकर्त्यांवर एफआयआर नोंदवला गेला आहे.

पोलिसांनी भाजपा नेता अमित वाल्मिकी यांच्या तक्रारीवरून एफआयआरची नोंद केली आहे. ज्यांच्या स्वागताच्यावेळी हा वाद उफाळला होता. वाल्मिकी यांनी गाझियाबादच्या कौशांबी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली व भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला. तक्रार दाखल झाल्यानंतर एफआयआर नोंदवला गेला आहे.

You May Also Like