शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट; डोळे लागले आकाशाकडे

चिमठाणे : प्रमोद शिंपी

भारतीय हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवतला आणि मृग नक्षत्रातच चांगल्या पावसाने सुरवात केली. दरम्यान बहुतांश शेतकर्‍यांनी मृग नक्षत्रातच खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्या. परंतु, ऐन पेरणी केल्यानंतर पावसाची आवश्यकता असताना पावसाने दंडी मारल्याने शेतकर्‍यांमधे चिंता वाढली आहे.

हवामान खाते व पंक्षाच्या हालचालीवरून शेतकर्‍यांनी पावसाचे संकेत घेत मूग, उडीद, तूर, सोयाबीन, कपाशी पिकाची पेरणी केली. जमीनीत पुरेशी ओल असल्याने बियाण्याला अंकुर फुटून पीक बाहेरही आले. यादरम्यान अंकुरलेल्या बियाण्याच्या वाढीसाठी वरच्यावर पावसाची आवश्यकता असते. अशातच आठवड्यापासून पावसाचा खंड पडल्याने उगवलेले बियाण्याचे कोंब उन्हामुळे करपत तर आहेत शिवाय प्राण्यांनी आपला मोर्चा शेतकाकडे वळून राहिले सुहिले अंकुरलेले बियाणे खाऊन बी फस्त करीत आहे.

कृषी विभागाने शेतकर्‍यांनी पेरणीस घाई करू नये असा सल्ला दिला होता. परंतु, मृग नक्षत्रात झालेला चांगला पाऊस व अधून मधून पाऊस पडेल या आशेवर शेतकर्यांनी महागडे बियाण्यांची पेरणी केली. आता शेतकर्याचा पावसाचा अंदाज चुकल्याने त्यांची अस्वस्थता वाढली आहे. दुबार पेरणीची संकट येते काय? या चिंतेने शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडे लागले आहे.

करोनाने दोन वर्षापासुन हाहाकार माजविला आहे. त्यातच अवकाळी पाऊस, वादळ असे एक ना एक सकंट शेतकर्‍यांवर येत आहे. अशातच शेतकर्‍यांनी अन्न धान्य न पिकविल्यास खाणार असा प्रश्न सर्वांना पडत आहे. तसेच चिमठाने परिसरात कोरडवाहू, बागायतदार शेतकरी असून यावर्षी मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र पावसाने पहिल्याच महिन्यात पाठ दाखविल्याने शेतकर्‍यांमधे नाराजी दिसुन येत आहे. तसेच शेतकर्‍यांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागते कि काय असा प्रश्न पडला आहे.

You May Also Like