राज्याच्या राजकारणातील करंट अपडेट्स

राज्याच्या राजकारणातील करंट अपडेट्स
➤ केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे देखील सुरतमध्ये दाखल झाले आहेत.
➤ राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षावर दाखल. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना.
➤ अजित पवार, दिलीप वळसे पाटील, अनिल देसाई आणि अरविंद सावंत विधानभवनात. नवीन गटनेता अजय चौधरी यांना पत्र दिले जाणार.
➤ बोरीवलीत शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा, प्रकाश सुर्वे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने शिवसैनिक संतप्त,
➤ प्रकाश सुर्वे यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी
➤ उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार
➤ राज्यात एकच धुमश्चक्री असताना काँग्रेसचेही 4-5 आमदार नॉट रिचेबल
➤ पवार- ठाकरे यांच्यात राज्यातील महाविकास आघाडी मधील राजकीय घडामोडी चर्चा होणार
➤ अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी परिस्थिती तशी असावी लागतं आहे, अधिवेशन 18 जुलै पासून आहे त्यामुळे आता अविश्वास ठराव आणण्याची ही वेळ
नाहीय- चंद्रकांत पाटील
➤ मंगळवारी रात्री शरद पवार मुंबईत आल्यानंतर एनसीपी नेत्यांसमवेत सिव्हर ओक येथे चर्चा करणार. पवार त्यानंतर सीएम ठाकरे यांची भेट घेणार.
➤ एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरुन काढल्यानंतर त्यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

You May Also Like