डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!

मुंबई ।  स्विंग किंग म्हणून प्रसिद्ध आणि वेगवान गोलंदाज डेल स्टेनने  क्रिकेटमधून निवृ्त्तीचा निर्णय़ घेतला आहे. त्याने काही वेळापूर्वीच स्वत:च्या अधिकृत ट्विटरवरुन याबाबतची माहिती देत हे जाहीर केलं. त्याने यावेळी काही आठवणीतील फोटो आणि आपलं स्टेटमेंट ट्विट केलं आहे.

 

 

दक्षिण आफ्रीका संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज असणाऱ्या स्टेनने एक काळ गाजवला होता. भल्या भल्या दिग्गजांना तंबूत धाडणाऱ्या स्टेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 699 विकेट्स घेतले आहेत. डेल स्टेनने शेअर केलेल्या निवृत्तीच्या संदेशात लिहिलं आहे, ’20 वर्ष सराव, सामना, विजय, पराभव या साऱ्यात अनेक आठवणी असून अनेकांच यासाठी धन्यवाद. मी आज अधिकृतरित्या निवृत्ती जाहीर करत आहे. सर्वांच पुन्हा एकदा धन्यवाद.’

You May Also Like