नरडाणा येथे दिवसा घरफोडी

तीन लाखांवर ऐवज लंपास
धुळे : नरडाणा (ता. शिंदखेडा) येथील सरस्वती कॉलनीतील घरातून चोरट्यांनी सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. काल (ता.7) सकाळी नऊ ते दुपारी पाऊणच्या सुमारास घटना घडली, रात्री उशिरा नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
शिवणकाम व्यावसायीयक अनिल ओंकार सोनवणे (वय 64) यांचे सरस्वती कॉलनी, विकास विद्यालयामागे निवासस्थान आहे. काल सकाळी नऊनंतर घर बंद होते.

त्यावेळी घराच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला, घरातील मुख्य खोलीतील लोखंडी कपाट फोडून आतील एकुण 3 लाख 7 हजारांचा ऐवज लंपास केला. त्यात 33 हजारांची रोकडसह चांदीचे वाळे, सोन्याच्या लहान अंगठ्या, चैन, तोंगल, पोत, मनीमंगळ सुत्र, काप आदी ऐवजचा समावेश आहे. याप्रकरणी अनिल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक शरद पाटील तपास करीत आहेत.

You May Also Like

error: Content is protected !!