”महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय!”

मुंबई : साईड डेस्टिनेशन”ची फुशारकी मारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय!” असं म्हणत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आणि महाविकास आघाडी सरकारवर  निशाणा साधला आहे. ‘

दरम्यान, नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असतानाच आता विरारमधील एका रुग्णालयातील कोविड सेंटरला भीषण आग लागली. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. दरम्यान,  विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. याच दरम्यान भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“राज्य सरकार आता तरी जागे व्हा!! नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असतानाचं विरारमध्ये व्यवस्थेतील निष्काळजीपणा दिसून आला. याला संपूर्णपणे ठाकरे सरकार ‘जबाबदार’ आहे” असं म्हटलं आहे. प्रविण दरेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “कोरोनापेक्षा “सरकारी मुर्दाडपणामुळे” अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला” असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.

तसच, “महाराष्ट्रातील रुग्णालय आग प्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे. भंडारा, भांडूप, नागपूर आणि आता विरार कोविड रुग्णालयांना आगी लागल्या, नाशिकला ऑक्सिजन गळती झाली. “कोरोनापेक्षा “सरकारी मुर्दाडपणामुळे” अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला” असं म्हटलं आहे.

“सुसाईड डेस्टिनेशन”ची फुशारकी मारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय! मृतांना श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत” असं देखील दरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये ही आग लागली. येथील कोविड सेंटरमध्ये एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like