हिस्सेवाटणीवरून झालेल्या मारहाणीत शेतकर्‍यांचा मृत्यू; आठ जण ताब्यात

सोनगीर : धुळे तालुक्यातील नंदाने येथिल वडिलोपार्जित शेतीच्या हिस्सेवाटणीवरून झालेल्या मारहाणीत जखमी शेतकर्‍याचा शनिवारी ( ता 29 ) मध्यरात्री रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी आठ संशयितांना चौकशीसाठी सोनगीर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नंदाने ता.धुळे येथे गुरुवारी (ता.27) रोजी वडिलोपार्जित जमिनीच्या हिस्से वाटणीवरून रात्री 11.30 वाजेच्या सुमारास मारहाणीत संशयित आरोपी ज्ञानेश्वर भगवान ठाकरे रा.नंदाने याने लोखंडी रॉडने नितीन रतीलाल अहिरे (पाटील) व रतीलाल रुपचंद अहिरे (पाटील) वय 45 यांना जखमी केले. या मारहाणीत जबर जखमी झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी रतीलाल अहिरे यांना धुळे येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र या घटनेतील जखमी रतीलाल रुपचंद अहिरे (पाटील) यांचा शनिवारी (ता.29) मध्यरात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शनिवारी पहाटेच्या सुमारास संशयित आरोपी ज्ञानेश्वर भगवान पाटील, मंगलबाई भगवान ठाकरे, सरलाबाई संजय सावळे, संजय गोकुळ सावळे, दिपक संजय सावळे, ज्ञानेश्वर संजय सावळे, हेमराज भगवान ठाकरे, येडाबाई रुपचंद अहिरे सर्व राहणार नंदाने या आठही जणांना पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले.

You May Also Like