तळीये दुर्घटनेत मृतांच्या आकड्यात वाढ, ३६ लोकांच्या मृत्यूची आतापर्यंत नोंद

रत्नागिरी | गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून 32 जणांचे मृतदेह बाजूला काढले. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

 

 

एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक करत आहेत.

 

एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासन संवेदनशील नाही. सरकार भावनाशून्य झालंय. शासनाच्या ही अशी निगरगट्ट यंत्रणा मी माझ्या आयुष्यात पाहिलेली नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आपला संताप व्यक्त केला. माझी शासनाकडे विनंती आहे की या घटनेकडे गांभीर्याने बघून त्वरित मदत कार्य सुरू करा, अशी मागणी दरेकर यांनी केली.ही घटना मोठी आणि दुर्दैवी असल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधून हेलिकॉप्टर मागवावे, असंही प्रवीण दरेकर म्हणाले

You May Also Like